खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन – अ. भा. छावा संघटना

chhawa sanghatana

 

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील मुख्य रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक जास्त प्रमाणात होत असल्यामुळे रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडलेले आहेत. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात गेल्या पंधरा दिवसात चार जणांचा बळी गेला आहे. हे खड्‌डे तातडीने बुजवावेत अन्यथा मोर्चा काढत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभागीयला निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.

तालुक्यातील अखत्यारीत असलेल्या रस्त्यांची अतिशय दुरावस्था झालेली असून जागो-जोगी खड्डे पडलेले आहेत. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झाली आहे. “रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता” असा संभ्रम निर्माण झालेला आहे. रस्त्यावर असलेल्या खड्यांमुळे नागरिकांना अतिशय कसरत करुन वाहन चालवावी लागत आहेत. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात कित्येक जण अपघाताला बळी गेले आहेत. तसेच खड्ड्यांमुळे नागरीकांच्या वाहनांचे देखील नुकसान होत असून नागरीकांना पाठीच्या व मनक्यांच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. हि समस्या तात्काळ सोडविण्यात यावी, अशा मागणीचे निवदेन अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभागीयला देण्यात आले असून मागणी पुर्ण न झाल्यास कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. तसेच होणा-या परिणामास शासन जबाबदार राहिल यांची नोंद घ्यावी असे देखील यावेळी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

निवेदनवेळी छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष विजय पाटील, अध्यक्ष ईश्‍वर पाटील, सागर भोसले, प्रताप पाटील, सुनील पाटील, मनोज पाटील व छावा संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content