राहुल गांधी संतापले नसल्याचा नेत्यांचा खुलासा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । काँग्रेस पक्ष राजस्थान सत्ता वाचवण्यात गुंतलेला असताना, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडलेली असताना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षतेपदावरून पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिल्याचा उल्लेख करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली.

या पत्रामागे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी नेत्यांना फटकारले होते. मात्र असे काही घडलेच नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले आहे.

गुलाम नबी आझाद यांनी ट्विट करत हे स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिले असे राहुल यांनी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही म्हटलेले नाही आणि त्यांनी असे बाहेरही कुठे म्हटलेले नाही, असे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. या वक्तव्यावरून आपण माझे भाजपशी संबंध असल्याचे सिद्ध केल्यास मी राजीनामा देईन असे वक्तव्य प्रसारमाध्यमांनी दाखवले. मात्र, प्रसारमाध्यमांनी ही चुकीची माहिती दिली असून, आपण तसे काहीएक म्हटले नसल्याचे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.

Protected Content