सावदा शहराच्या हद्दीबाहेरील वसाहतींमध्ये सुविधांच्या द्या : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मागणी

सावदा, प्रतिनिधी । गेल्या वर्षापासून सावदा शहर हद्दीबाहेरील रहीवाशी नागरीकांना शहरातील नागरीकांपेक्षा अवास्तव दुपटीने पाणी पट्टीचा कर भरण्याचा भुर्दड सोसावा लागत असून तेथील नागरिकांच्या पाणी पट्टीत कपात करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गटनेते फिरोज खान हबीबुल्लाखान पठाण यांच्या नेतृत्वात मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

मागील वर्षभरापासुन शासनाने शहराच्या हद्दवाढीस मंजुरी दिली आहे. यामुळे हदवाढीतील नागरीक शहर हद्दवाढीत समाविष्ट झालेले आहेत. तेव्हा तेथील नागरीकांच्या पाणी पट्टीचा कर कपात करून हद्दीबाहेरील रहिवाश्यांना शहरातील रहिवाश्यांप्रमाणे कर लावण्यात यावा आणी दिलासा दयावा.

तसेच हद्दवाढीतील नागरीकांना नविन नळ कनेक्शन जोडणीसाठी देण्यात येणारी डिपॉझीट डिमांड नोट शहरातील आकारणीप्रमाणे आकारण्यात यावी. आताही नविन नळ कनेक्शनसाठी अवास्तव डिमांड नोट आकारण्यात येत आहे. यंदापासुन लक्षपुर्वक कपात करून तेथील नागरीकांना डिमांड नोट हद्दीतील प्रमाणे देऊन दिलासा दयावा. हद्दीबाहेरील भागात गटारी नसल्यामुळे वारंवार पावसाचे पाणी घरात घुसुन नुकसान होत आहे.

या भागात येजा करण्यासाठी रस्ते नाही. त्या भागात सर्व दुर गारा-चिखल झालेला असल्याने त्वरीत खरवा किंवा मुरूम टाकून ये-जा करण्यासाठी रस्ते करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनांवर फिरोज खान हबीबुल्लाखान पठाण, राजेश गजानन वानखेडे, सिध्दार्थ किटकुल बडगे,मिनाक्षी राजेश कोल्हे, नाजेरा ईश्तेहाक बागवान,. विजया कुशल जावळे, किशोर या बेंडाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content