बिगुल वाजला : लोकसभा निवडणुकांची घोषणा !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । गत अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असणार्‍या लोकसभा निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली असून रणधुमाळीस खर्‍या अर्थाने प्रारंभ झाला आहे. तसेच आजपासून देशभरात आचारसंहितादेखील लागू झाली आहे.

लोकसभा निवडणुकांची नेमकी केव्हा घोषणा होणार याबाबत प्रचंड उत्सुकता लागून होती. केंद्र व राज्य सरकारने अलीकडच्या काळात विविध लोकप्रिय घोषणांसह अनेक कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्याचा सपाटा लावल्यामुळे कोणत्याही क्षणाला निवडणुकांची घोषणा होईल असे सर्वांना वाटत होते. या अनुषंगाने आज सकाळीच निवडणूक आयोगाची विज्ञान भवनात पत्रकार परिषद होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाले. या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा वापर होणार आहे. तसेच आजपासून देशभरात आचारसंहितादेखील लागू झाली आहे.

दरम्यान, आज सायंकाळी पाच वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेण्यात आली. यात लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम व अरूणाचल प्रदेश आदी राज्यांची विधानसभा निवडणुकीचीही घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. ते म्हणाले की, या वेळच्या निवडणुकीत तब्बल ९० कोटी मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यावेळी व्हीव्हीपॅट प्रणालीचा वापर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी कायदा व सुव्यवस्थेसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहितीदेखील दिली. यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत घोषणा केली. ते म्हणाले की, या वर्षी लोकसभा निवडणुक ही सात टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. ते म्हणाले की, या वर्षी लोकसभा निवडणुक ही सात टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. यातील पहिला टप्पा २५ मार्चपासून सुरू होणार आहे. तर निवडणुकीचा पहिला टप्पा ११ एप्रिलपासून होणार आहे. यात टप्पे ११ एप्रिल, १८ एप्रिल, २३ एप्रिल, २९ एप्रिल, ६ मे, १२ मे आणि १९ मे अशा सात टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार असून २७ मे आधी सरकार अस्तित्वात येणार आहे.

महाराष्ट्रात एकूण चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. महाराष्ट्रात एकूण चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यात ११ एप्रिलला सात जागा, १८ रोजी १०, २३ एप्रिलला १४ तर २९ एप्रिल रोजी १७ जागांसाठी मतदान होणार आहे.

Add Comment

Protected Content