जयवंता आजीचे तहसीलदारांकडून समाधान (व्हिडीओ)

 

रावेर, प्रतिनिधी । खिरवड येथील ७० वर्षाय आजीची संजय गांधी निराधार योजनेचे पेंशन घेण्यासाठी पायीवारीची बातमी लाईव्ह ट्रेंड न्यूजवर प्रसिध्द होताच तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी आजीला आज कार्यालयात बोलावून समजवून सांगून पेंशन सर्व आजीच्या खात्यात जमा असल्याचे कागदोपत्री दाखवले व आजीचे समाधान केले. तहसिल प्रशासना मार्फत किटही दिले.

खिरवड येथील जयवंताबाई अटकाळे वय ७० या आजी जवळ पैसे नसल्याने रावेर पर्यंत पायी येतांनाची न्यूज महाराष्ट्रभर व्हायरल झाली.शनिवारी बातमी प्रसिध्द होताच सर्वात आधी पो नी रामदास वाकोडे थेट त्यांच्या घरी जाऊन सुटीच्या दिवशी आर्थिक मदत केली इतर स्वयंसेवी संस्था आणि काही दातेही पुढे आले होते .

रावेर तालुक्यातील जयवंतबाई अटकाळे सारख्या इतर वृध्द आजी व वृध्द बाबा संजय गांधी निराधार योजनांची प्रकरणे मंजूर झाले किंवा नाही याची चौकशी करण्यासाठी रावेरात येतात जयवंतआजीची बातमीने महसूल प्रशासनाने दखल घेतली परंतु इतरांच्या वयाचे गांभिर्या लक्षात घेऊन प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गे लावावी हीच अपेक्षा.

रावेर संजय गांधी निराधार योजनेत विविध योजनांसाठी जानेवारी ते जुलै दरम्यान बाराशे प्रकरणे आली यातील जानेवारीत २१४ प्रकरणे मंजूर करून यादी प्रसिध्द झाली होती त्यानंतर तहसिल प्रशासनाने तब्बल सात महीन्यांनी पुन्हा ३५० प्रकरणे मंजूर केली परंतु ऑगस्ट संपण्यात आला तरीही मंजूर प्रकरणाच्या याद्या प्रसिध्द झाल्या नाही तब्बल आठ महिन्यां पासुन तालुक्यातील विविध जयवंतआजी सारख्या वृध्द व्यक्ती याद्या प्रसिध्द होण्याच्या प्रतिक्षेत आहे.

जयवंतआजी’ना पेंशन मिळत असले तरी आजीचे खाते रावेर यूनियन बँकेत आहे ते बंद करून खिरवड गावात असलेल्या बँकेत आजीचे खाते उघडण्यात यावे तालुक्यातील इतर वृध्द व्यक्तीनी देखिल स्थानिक गावातच खाते उघडल्यास त्यांची होणारी पायीपीट थांबेल.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/338714784204295/

 

Protected Content