चिंताजनक : देशभरात 24 तासांत तब्बल 45,720 रुग्ण सापडले !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील 24 तासांत 45,720 नव्या रुग्णांची मोठी भर पडली आहे. तर 1,129 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 12 लाखांचा टप्पा पार केला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

 

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 12,38,635 वर पोहचला आहे. त्यापैकी 4,26,167 सक्रीय रुग्ण असून रुग्ण 7,82,606 कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात एकूण 29,861 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 12 लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 12 लाख 38 हजार 635 इतकी झाली आहे. आतापर्यंत सात लाख 82 हजार 606 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर चार लाख २६ हजार १६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रातही बुधवारी कोरोना रुग्णांच्या दैनंदिन नोंदीत मोठी वाढ झाली.  राज्यात बुधवारी 10 हजार 576 रुग्णांची नोंद झाली, तर 280  कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याची एकूण रुग्णसंख्या 3 लाख 37 हजार 607 वर पोहोचली असून आतापर्यंत 12 हजार 566 मृत्यू झाले आहेत.

Protected Content