राष्ट्रवादी युवक काँग्रेस ‘जय भवानी जय शिवाजी’ लिहिलेली २० लाख पत्र उपराष्ट्रपतींना पाठवणार

पुणे (वृत्तसंस्था) उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिली होती. यानंतर व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत अशा घोषणा देऊ नये अशी समज दिली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली २० लाख पत्रं पाठवणार आहेत.

 

काल राज्यसभेमध्ये नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाला. या शपथविधीवेळी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ पूर्ण झाल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली होती . त्यावरून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना सभागृहात अशा घोषणा देऊ नये, अशी समज दिली होती. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना २० लाख पत्रे पाठवण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू माफी मागत नाहीत, तोपर्यंत खासदार उदयनराजे यांनी राज्यसभेच्या कामात भाग घेऊ नये, अशी भूमिका ब्राह्मण महासंघाच्या अनिल दवे यांनी घेतली आहे. शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजयुमोच्या वतीने त्यांच्या मुंबईतील घरच्या पत्त्यावर ‘जय श्रीराम’ लिहिलेली 10 लाख पोस्टकार्ड राज्यभरातून पाठवणार आहेत. त्यालाच उत्तर म्हणून राष्ट्रवादीकडून व्यंकय्या नायडूंना 20 लाख पत्रे पाठवली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितलं.

Protected Content