चाळीसगाव, प्रतिनिधी । स्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त व स्व.वाडीलाल राठोड यांच्या जयंतीनिमित्त आमदार यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनादिन व स्व.वाडीलाल राठोड यांच्या जयंतीनिमित्त आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी कोरोना नियमांचे पालन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, सरचिटणीस अमोल नानकर, जितेंद्र वाघ, प्रशांत पालवे व चितेगावचे माजी सरपंच अण्णा गावडे आदी उपस्थित होते.