यावल-वड्री रस्त्याचे काम निकृष्ठ प्रतिचे; वाहनधारकांची ओरड

rasta

यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील आदीवासी क्षेत्राशी जोडणारा मार्ग यावल ते वड्री रस्त्यावरील यावल ते सातोद पर्यंतच्या मार्गावर डांबरीकरणाचे काम हे प्रगतीपथावर असुन, कामाचा ठेकेदार हा रस्ता अत्यंत निकृष्ठ प्रतीचा करीत असल्याची तक्रार अनेक नागरीकांची व वाहनधारकाची ओरड असुन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी या कामाची गुणवता तपासुन घ्यावी अशी मागणी होत आहे.

याबाबतची माहीती अशी की, गेल्या काही दिवसापासुन यावल ते सातोद या 3 किलोमिटर मार्गा वरील रस्त्याचे सुमारे 1 कोटी रुपयांच्या निधीतुन डांबरीकरणचे काम करण्यात येत आहे. मात्र संबंधीत ठेकेदार हा शासकीय अंदाज पत्रकाव्दारे करीत नसल्याचे नागरीकामध्ये बोलले जात असुन अनेक वाहनधारकांची देखील तक्रार आहे. यावल ते सातोद या मार्गावर पुर्वीपासुन डांबरीकरणाचा रस्ता आहे याच रसत्यावरशी संबधीत ठेकेदार अत्यंत घाईगर्दीने या कामावर सिंगल लेअर टाकुन थातुरमातुर काम करून घेण्याच्या तय्यारीत असल्याने या कामाच्या गुणवते बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून येणाऱ्या पहील्याच पावसात या रस्त्याचे तिन तेरा वाजल्या शिवाय राहणार नाही. या कामा विषयी ज्यांच्या निगरानी खाली सदरचे काम सुरू आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आर. बी. तायडे यांनी मात्र ठेकेदाराची बाजु घेत संबधीत सस्त्याचे काम चांगले होत असल्याचे सर्टीफिकेटच देवुन टाकले तरी नागरीक आणी वाहनधारकांच्या मागणी वरून या रस्त्याच्या गोंधळात सुरू असलेल्या कामाची चौकशी करून नागरीकांच्या शंकेचे निराकरण करावे अशी मागणी होत आहे.

Add Comment

Protected Content