व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसंस्था | एकीकडे इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य त्रस्त झालेले असतांना आता व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे बाहेर खाणे हे महाग होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशभरात आजपासून एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर लागू झाले आहेत. यंदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात २५० रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आली आहे. तर, घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मागील २२ मार्च रोजी एलपीजीच्या दरात वाढ झाली होती.

आज एक एप्रिल म्हणजेच नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस, पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरचे  नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर असून, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आजपासून व्यवसायिक सिलिंडरच्या दरामध्ये तब्बल २५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. २२ मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती, तर व्यवसायिक सिलिंडर स्वस्त झाले होते. मात्र आज घरगुती सिलिंडरचे दर स्थिर असून, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल २५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हा व्यवसायिकांसाठी मोठा झटका मानण्या येत असून, सिलिंडरचे दर वाढल्याने हॉटेलमधील जेवन महाग होण्याची शक्यता आहे.

Protected Content