मुंबईत ट्रकखाली दबल्याचे चौघांचा मृत्यू

0
18


मुंबई प्रतिनिधी । मुंबईतल्या विक्रोळी येथे ट्रकखाली दबून चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रात्री घडली.

याबाबत वृत्त असे की, धान्याने भरलेला हा ट्रक जात असताना ट्रकचं मागचं चाक गटाराचं झाकण तोडत आत रुतलं. त्यामुळे ट्रक पलटला. रस्त्याकडेला उभे असलेले पाच जण या ट्रकखाली दबले गेले. यात चार जण चिरडून ठार झाले झाले एक जण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गटाराचे काम अलीकडेच आठवड्याभरापूर्वी झाले होते. ते निकृष्ट असल्यानेच झाकण तुटले गेले, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here