संभाजी भिडे यांचे वक्तव्य पुन्हा वादाच्या भोवर्‍यात

पुणे – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । इस्लाम धर्म हाच खरा देशाचा शत्रू आहे असं म्हणत शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे  गुरुजींनी हिंदु-मुस्लीम समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. शिरुर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मास निमित्त कार्यक्रमातील त्यांच्या वक्तव्यावरून आता वादंग निर्माण झाले आहे

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास सध्या सर्वत्र पाळला जात असताना ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या  दौर्‍यावर आहेत.  त्यांनी वढू बुद्रुक येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर दर्शन घेतले. त्यानंतर शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, निर्वी या गावात जाऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संभाजी भिडे म्हणाले, इस्लाम हा आपल्या भारताचा खरा शत्रू आहे. संभाजी महाराजांचं बलिदान म्हणजे हिंदुस्थानच्या अस्तित्वाला असलेले आव्हान दडलेलं आहे. संभाजी महाराज आणि औरंगजेब हे दोन व्यक्ती होते आणि त्यांच्यात वैर होतं म्हणून औरंगजेबाने त्यांना तुकडे-तुकडे करुन मारले नाही. तर यामागे औरंगजेबाच्या मनात असलेली इच्छा होती. संपूर्ण भारत देशाचे तुकडे तुकडे करुन हिंदु समाज संपवून टाकावा अशी त्याची इच्छा होती. या रागातूनच त्याने संभाजी राजेंना मारलं.

संभाजी राजे आज नाहीयेत आणि औरंगजेबही नाहीये. पण औरंगजेब पाकिस्तानच्या रुपाने, बांग्लादेशच्या रुपाने, गावांमध्ये वसलेल्या मुसलमानांच्या रुपाने शिल्लक आहे. आजही इस्लामच्या पोटतिडकीने औरंगजेबाने संभाजीराजेंना मारलं. तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे. हा इस्लाम आजही अनेक रुपात गावोगावी हिंदुस्थानात नांदतोय आणि हिंदुस्थानाच्या बाहेर नांदतोय. या इस्लामला त्याच पोटतिडकीने उत्तर देण्याची ताकद हिंदू समाजात असून उत्तर दिले पाहिजे असंही संभाजी भिडे म्हणाले.

संभाजी भिडे यांची वक्तव्ये आधी देखील वादात सापडली होती. यात आता या नव्या वक्तव्याने ते पुन्हा वादाच्या भोवर्‍यात सापडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Protected Content