जिल्ह्यातील ७८३ गावांमध्ये होणार निवडणूक

जळगाव प्रतिनिधी । राज्य निवडणूक आयोगाचे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर केला असून याच्या अंतर्गत जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळीस प्रारंभ होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे आज राज्यातील १४२३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात मार्च ते डिसेंबर २०२० या कालखंडात कालावधी संपलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये मध्यंतरी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आता सर्वत्र अनलॉक होत असतांना ग्रामपंचायत निवडणुका देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबरपर्यंत
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार १५ डिसेंबर रोजी निवडणुकीची सूचना प्रकाशित होणार आहे. उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची मुदत २३ ते ३० डिसेंबर पर्यंत राहणार आहे. ३१ रोजी छाननी होणार असून ४ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १८ रोजी मतमोजणी होणार आहे.

25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार
विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

Protected Content