शिवाजी नगरात चोरीच्या दोन दुचाकींसह दोघांना अटक; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील आयडीबीआय बँकेसमोरून दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना शहर पोलीसांनी अटक केली असून दोघांकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगरातील चंद्रकांत गजानन बोदवडे रा. शिवाजी नगर हे जळगावात १२ सप्टेंबर २०१९ रोजी शहरातील नेहरू पुतळ्याजवळील आयडीबीआय बँकेजवळ दुचाकी (एमएच १९ सीजी ३५६५) डीलक्स लावून गणपती विसर्जनासाठी मिरवणूकीत गेले. दरम्यान मिरवणूकीनंतर दुचाकी जागेवर आढळून आली नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

१४ डिसेंबर २०२० रोजी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भास्कर ठाकरे, पो.ना. गणेश पाटील, ओम पंचलिंग आणि निलेश पाटील हे शिवाजीनगरातील स्मशानभूमीजवळ पेट्रोलिंग करत असतांना दोन जण दुचाकीवर संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले. दोघांना जवळ बोलावून माहिती घेतली असता जिवन सुकदेव ठाकरे (वय-२२) आणि पवन सुनिल कोळी (वय-२०) दोन्ही रा. कोळी वाडा डांभूर्णी असल्याचे नाव सांगितले. सोबत असलेल्या दुचाकीची माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांपैकी एक गाडी शहर पोलीसात चोरीप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे लक्षात आले. दोन्ही भामट्यांनी चोरीच्या दुचाकीचा क्रमांक बदलवून बनावट नंबर टाकून फिरत होते. खाक्या दाखविता दोघांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरक्षण धनंजय वेरूळे यांना माहिती दिल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सफौ वासुदेव सोनवणे, पोहकॉ विजय निकुंभ,‍ भास्कर ठाकरे, अक्रम शेख, प्रफुल्ल धांडे, रतन गिते यांच्यासह पो.ना. गणेश पाटील, ओम पंचलिंग यांनी कारवाई करत दोघांना अटक केली. दोघांकडून बनावट नंबर असलेल्या दोन दुचाक्या हस्तगत करण्यात आले आहे. यातील एक साथिदार फरार आहे. पुढील तपास पो.ना. भास्कर ठाकरे करीत आहे

Protected Content