टीआरपी घोटाळ्यात बोगस कंपन्या

मुंबई: वृत्तसंस्था । टीआरपी घोटाळ्यात नवनवीन प्रकार समोर येत असून संशयित वाहिन्यांनी आणि आरोपींनी बोगस कंपन्या थाटल्या होत्या असे उघड झाले आहे. काही पुरावे मुंबई पोलिसांच्या हाती आहेत. विशेष पथकाने पवई येथून हरिष पाटीलला अटक केली. पाटीलच्या नावे सात कंपन्यांची नोंद आहे

मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमले आहे. एका पथकाने गुरूवारी हरिष पाटीलला अटक केली. पाटीलच्या नावे सात कंपन्यांची नोंद असून त्यापैकी कॅप्स लॉक डीजीटल सोल्यूशन नावाच्या कंपनीद्वारे एका संशयीत वाहिनीचे आर्थिक व्यवहार समोर आले आहेत. पथकाने प्रत्यक्ष शहानिशा केली असता दिलेल्या पत्त्यावर अशी कोणतीही कंपनी आढळली नाही. या कंपनीचे देशभरात १४२२ वेण्डर असून पाटील त्यापैकी एक आहे. पाटील याच्या अटकेने या घोटाळ्यातील अटक आरोपींची संख्या ९ वर पोहचली आहे. रिपब्लीक वाहिनीचे सीएफओ शीवा सुंदरम अणि वितरण विभागाचे प्रमुख घनश्याम सिंग यांची तिसऱ्यांदा चौकशी करण्यात आली.

Protected Content