बेकायदेशीर गावठी दारू विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मील परिसरात बेकायदेशीर गावठी दारूची विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी रविवारी २९ मे रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील भिंतीच्या आडोशाला सविता भिकन कोळी (वय-३६) रा. गेंदलाल मिल ही महिला बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना मिळाली.

त्यानुसार त्यांच्या पथकाने रविवारी २९ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास धडक कारवाई करत गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिला सविता भिकन कोळी यांच्याकडून २ हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश भांडारकर, भास्कर ठाकरे, राजकुमार चव्हाण, योगेश इंधाटे महिला पोलीस शिपाई जयश्री ठाकूर यांनी ही कारवाई केली आहे.

Protected Content