विवाहितेला छळ : घर बांधण्यासाठी सहा लाखांची सासरच्यांकडून मागणी

भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घर बांधण्यासाठी माहेरहून ६ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव शहरातील माहेर असलेल्या ऐश्वर्या मनोज अवचिते (वय-२३) यांचा विवाह नाशिक येथील मनोज भगवान अवचिते यांच्याशी रितीरिवाजानुसार सन २०१६ मध्ये लग्न झाले. लग्नाच्या सुरुवातीला काही दिवस चांगले गेले. त्यानंतर त्यांच्या संसारवेलीवर एक मुलगी झाली. दरम्यान मनोज अवचिते याने विवाहितेला घर बांधकामासाठी माहेरहून ६ लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. परंतु विवाहितेच्या माहेरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पैश्यांची पूर्तता करू शकले नाही. दरम्यान याबाबत विवाहितेच्या आई, वडील व भाऊ यांनी समजून सांगितले, असता त्यांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली. दरम्यान या प्रकारावर छळाला कंटाळून माहेरी निघून आल्या. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून २७ एप्रिल रोजी पती मनोज भगवान अवचिते, सासरे भगवान किसन अवचिते, सासू कमलबाई भगवान अवचिते, जेठ विशाल भगवान अवचिते, जेठाणी भाग्यश्री विचार अवचिते सर्व रा. एकलहरा रोड, नाशिक यांच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोहेकॉ शमीना पठाण करीत आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content