बोदवड शिवसेना गट नोंदणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | बोदवड नगर परिषद येथील नवनिर्वाचित शिवसेनेच्या नगरसेवक व नगरसेविका यांचा गट नोंदणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे आज सादर करण्यात आला.

 

याप्रसंगी आ. चंद्रकांत पाटील, आनंदा पाटील, सईदभाई बागवान, बेबीताई माळी, बेबीताई चव्हाण, मनिषा बडगुजर, मीरा माळी, रेखा गायकवाड, पूजा जैन, शारदा बोरसे उपस्थित होते.  जेष्ठ नगरसेवक आनंदा पाटील यांची शिवसेना पक्षाचे गटनेतेपदी  तर उप गटनेतेपदी  बेबीताई माळी यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी आंनदराव देशमुख, स्वीय सहाय्यक प्रविण चौधरी, तुषार बोरसे, देवेंद्र खेवलकर, शांताराम कोळी, पियुष मोरे, संदीप वानखेडे, दिनेश माळी, संजय गायकवाड, हर्षल बडगुजर, निलेश माळी, प्रितेश जैन,कलीम शेख, गोपाल पाटील, गणेश भोई, अमीन मण्यार, शरीफ मण्यार, जमिल बागवान, मनोज पाटील, मोहसीन बागवान, राजू काळे हे उपस्थित होते. बोदवड शहराचा सर्वागीण व शाश्वत विकास करण्यासाठी आ. चंद्रकांत पाटील सर्व प्रयत्न कायम सुरूच आहेत. आपल्या शहराचे रूप बदलून टाकण्यासाठी येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून नियोजनबद्ध कामे केली जाणार आहेत.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/647667669699801

 

Protected Content