पत्रकार शेख सत्तार यांना श्रध्दांजली

भुसावळ : प्रतिनिधी । येथील पत्रकार शेख सत्तार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल येथे बुधवारी सामूहिक श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रास्ताविक श्रीकांत जोशी यांनी केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण , रोटरी क्लबचे ठाकूर आणि रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे पीआरओ निलेश वाणी यांनी यांनी मनोगत व्यक्त करून सत्तार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

भविष्यात पत्रकारांच्या कुटुंबावर अशी वेळ येउ नये यासाठी खबरदारी घेण्यासाठी सूचना करण्यात आली. सत्तार यांच्या कुटूंबाला मदत करण्याचे ठरविण्यात आले. समाजाला न्याय देण्यासाठी धदपडणाऱ्या पत्रकारांच्या परिवाराला पाठबळ कोणाचे ? असाही प्रश्न उपस्थित झाला.

यावेळी प्रेम परदेशी, निलेश गोरे , नेवे, किशोर शिंपी, आशिष पाटील, शंतनु गचके , उदय जोशी, उज्वला बागूल, सतीश कांबळे, संतोष शेलोडे, कलिम पायलट, गणेश वाघ आदी मुद्रण आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित होते .

Protected Content