तरूणीची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नेहरू चौकाजवळील बिग बाझार रोडवरून तरूणीची ४५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत सोमवारी १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोनाली सागरमल सोमाणी रा. श्रीरामनगर, दादावाडी ता. जळगाव ही तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान, शहरात गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता दुचाकी (एमएच १९ सीके ७११९) ने मित्रांसोबत गणपती पाहण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी त्यांची दुचाकी नेहरू चौकातील बिगबाजारच्या रस्त्यावर पार्किंगला लावून गणपती उत्सवात सहभागी झाल्या. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. रात्री १०.३० वाजेता घरी जाण्यासाठी सोनाली सोमानी ह्या दुचाकीजवळ आल्या असता त्यांना दुचाकी आढळून आली नाही. दुचाकीचा सर्वत्र शोध घेून न मिळाल्याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश बोरसे करीत आहे.

Protected Content