चितोडा येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयोजित श्रमसंस्कार शिबीर

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर चितोडा येथे सुरू आहे. सहाव्या दिवशी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम संपन्न झाले. सकाळच्या सत्रात मध्ये स्वयंसेवकांनी गावातून स्रीभृण हत्या रॅली काढून जनजागृती करताना पथनाट्य सादर केले.

सकाळच्या दुसऱ्या सत्रात स्वयंसेवकांनी जिल्हा परिषद मराठी शाळेच्या परिसरातील स्वच्छता व प्राथमिक आरोग्य केंद्रातील श्रमदानातून साफसफाई केली. दुपारच्या तिसऱ्या सत्रात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, लोकनियुक्त सरपंच अरुण पाटील, ग्रामविकास अधिकारी पी.व्ही. तळले, पोलिस पाटील पंकज वारके आदींच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त हुतात्मा दिवस साजरा करण्यात आला. यात महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यात संतोष पावरा व जयश्री धनगर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमात संकलित केलेले गहू, तांदूळ व इतर धान्य गावातील गरजु कुटुंबातील महिला गं. भा. भारती भारंबे, गं.भा.वैजंताबाई कोलते व उषा चव्हाण यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सुपूर्त करण्यात आले.

दुपारच्या सत्रात ग्रामीण रुग्णालय, यावल येथील वैज्ञानिक अधिकारी नानासाहेब घोडके, टेक्निशियन रवींद्र माळी, लिंक वर्कर्स पवन जगताप, राजनंदिनी पाटील, उर्मिला शिर्के यांनी सिकल सेल व हिमोग्लोबिनची वैद्यकीय तपासणी करून स्वयंसेवकांचे व ज्येष्ठ नागरिकांचे मनोबल वाढवले. दुपारच्या प्रबोधन सत्रात जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विभागीय समन्वयक डॉ. जयंत नेहते यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतून समाजप्रबोधन या विषयावर मार्गदर्शन करून संवाद साधला. तसेच स्वयंसेवकांनी विद्यापीठ स्तरीय तसेच राज्यस्तरीय शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या महाविद्यालयाचे नाव लौकिक करावे असे आवाहन केले. तसेच डॉ. निर्मला पवार यांनी बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला डॉ. ए. एन. सोनार, डॉ.एस.एन. वैष्णव, प्रा. चिंतामण पाटील, प्रा. राजू तडवी व प्रा. मयुर सोनवणे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्टीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. डी. पवार यांनी केले तर आभार प्रा. सुभाष कामडी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली कोष्टी, अमृत पाटील, वेदांत माळी, मनोज बारेला, दिक्षा पंडित, तेजश्री कोलते यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Protected Content