आमदार गिरीश महाजन यांचे होमीओपॅथी डॉक्टरांद्वारे जंगी स्वागत (व्हिडिओ)

जामनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्यातील पहिले मेडीकल हब तत्कालीन वैद्यकीय मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांतून चिंचोली शिवारात उभारण्यात येणार असल्याने होमिओपॅथी डॉक्टरांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे.

 

आमदार गिरीश महाजन हे वैद्यकीय मंत्री असतांना त्यांच्या प्रयत्नातून जळगाव जिल्ह्यात राज्यातील पहिले मेडिकल हब चिंचोली शिवारात उभारण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होमिओपॅथिक पदवीची सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबत जामनेरसह जळगाव जिल्ह्यातील सर्व होमिओपॅथी डॉक्टरांनी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्यावर फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत केले. याप्रसंगी डॉ. रितेश पाटील(जळगाव), चामुंडा माता होमिओपॅथी महाविद्यालय जळगावचे  प्राचार्य डॉ. समीर साठे, डॉ. मनोज विसपुते, डॉ. देवानंद कुलकर्णी, जामनेर तालुका अध्यक्ष डॉ. योगेश इंगळे, डॉ. विश्वनाथ शेळके, डॉ. रुपेश पाटील, डॉ. नंदकिशोर कोल्हे (यावल), डॉ. पंकज चौधरी (चोपडा), डॉ. महेश वाणी (चाळीसगाव), डॉ. नवीन महाजन (एरंडोल), डॉ. विकास कळसकर (भुसावळ), डॉ. प्रफुल्ल पाटील यांच्यासह जिल्हातील सर्व तालुक्यातील होमिओपॅथी डॉक्टर तसेच चामुंडा माता होमिओपॅथी महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/300908915561406

 

Protected Content