जामनेर येथे चोरीच्या दुचाकीसह चोरट्यास अटक; एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । पहूर येथील चोरीची दुचाकी घेवून फिरत असलेल्या संशयित आरोपीस दुचाकीसह जामनेरातून अटक करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी पहूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस ठाण्यात भाग-५ गुरनं २४३/२०२०२ प्रमाणे दुचाकी चोरी गेल्याप्रकरणी गुन्हा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, चोरीची दुचाकी जामनेर शहरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या पथकातील स.फौ.अशोक महाजन, पो.ना. युनुस शेख, पो.ना. किशोर राठोड, पोहेकॉ सुरज पाटील यांनी जामनेर शहरात जावून संशयित आरोपी शेख सलीम शेख शब्बीर रा. घरकुल बिल्डींग, जामनेर याला दुचाकीसह रविवारी अटक केली. पुढील कारवाईसाठी पहूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content