देशात कोरोना संक्रमणमुक्त रुग्णांचा आकडा ५० लाखांच्या घरात

 

नवी दिल्ली : ‘वृत्तसंस्था । सोमवारी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना संक्रमितांचा एकूण आकडा ६० लाखांच्या पुढे गेला रविवारी एका दिवसात ८२ हजार १७० बाधित रुग्ण आढळले आहेत तर १०३९ कोरोनारुग्णांचा मृत्य झाल्याची नोंद करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे एकूण ६० लाख रुग्णांपैंकी संक्रमणमुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा ५० लाखांच्या घरात पोहचलाय. ही दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल. ११ दिवसांत १० लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केलीय.

देशात आत्तापर्यंत ६० लाख ७४ हजार ७०३ रुग्ण आढळले. तब्बल ५० लाख १६ हजार ५२१ रुग्णांनी यशस्वीरित्या मात केली. ९ लाख ६२ हजार ६४० रुग्णांवर उपचार सुरू आहे. एव्हाना ९५ लाख ५४२ जणांनी प्राण गमावले.

 

भारतात दररोज सरासरी ९० हजार रुग्ण आजारातून बरे होत आहेत. आत्तापर्यंत संक्रमणमुक्त झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा हा अॅक्टिव्ह केसेसच्या तुलनेत पाच पटीनं अधिक आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबररोजी ७ लाख ०९ हजार ३९४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आत्तापर्यंत देशात ७ कोटी १९ लाख ६७ हजार २३० नमुन्यांची चाचणी पार पडली.

Protected Content