रावेर, यावल तालुक्यातील रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम 30 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

b7dc8c82 9989 415a a8ad 1b295e8e7324

 

जळगाव (प्रतिनिधी) यावल व रावेर तालुक्यातील पाणीपातळीवर खोलवर गेल्यान या तालुक्यांमध्ये केद्र शासनाच्यावतीने जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी या तालुक्यांमधील 204 गावे व 4 नगरपालिका क्षेत्रात रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम 30 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्या.

जलशक्ती अभियानाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव व यावल वन विभाग, जलसंधारण, कृषि, संबंधित पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, तहसिलदार ,प्रांताधिकारी आणि इतर सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

जलसंधारण विभागामार्फत नाले बांधकाम, नाले खोलीकरणासारखे छोटे व कमी खर्चात आणि हमखास पाणी साठवणूकीचे साधने निर्माण करावीत. त्याचबरोबर नागरीकांमध्ये जलशक्ती अभियानाचा प्रचार व प्रसार व्हावा याकरीता उपायायोजना कराव्यात. याप्रसंगी जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रकाश मोराणकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, उपसंचालक अनिल भोकरे, भुसावळचे प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, यावल, रावेरचे गटविकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात जलयुक्त शिवार किंवा जलशक्ती अभियानात यंत्रणांनी अडचणी दाखविण्यापेक्षा प्रामाणिक प्रयत्न केल्यास जलशक्ति अभियान यशस्वी होण्यास कुठलीही अडचण येणार नाही. याबाबत त्यांनी राजस्थानातील एका गावाचे उदाहरणही बैठकीत दिले.

Protected Content