यावल तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह शंभरीच्या उंबरठ्यावर

 

 

यावल, प्रतिनिधी । कोरोना संसर्गाचा थैमान तालुक्यात प्रचंड प्रमाणावर वाढला असुन आज मिळालेल्या कोरोनाची लागण झालेल्या तालुक्यात बाधीत रुग्णांच्या संख्येत नव्याने १७ रुग्णांची नोंद झाली आहे. तालुक्यात बाधीतांचा आकडा हा शंभरीच्या उंबरठयावर पोहचला आहे. या आकडेवारीमुळे  सर्वत्र एकच खळबळ उडाली असून चिंतेचे सावट पसरले आहे.

आरोग्य यंत्रणेकडुन मिळालेल्या माहितीनुसार आज शनिवार दि. १३ जुन रोजी आढळुन आलेल्या नव्या कोरोना बाधीता रुग्णांची संख्या यावल शहर ४, फैजपुर ८, पाडळसा २, अट्रावल २ आणि १ अशी एकुण रूग्णांची संख्या १७ असुन आता यावल तालुक्यातील एकुण कोरोना बाधीत रुग्णांची संख्याही ८४ वर पोहचली असल्याची माहिती तहसीलदार जितेन्द्र कुवर आणि प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन यांच्याकडुन प्राप्त झाली आहे. शंभरीच्या जवळ पहोचलेली ही संख्या आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढवणारी असुन कोरोना बाधीत रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्याही प्रशासनाची अधिक चिंता वाढवणारी आहे. यासाठी प्रशासनासह नागरिकांना यामुळे सतर्क आणि  जागरूक राहावे लागणार आहे. प्रशासनाच्यावतीने नागरिकांना आपली व आपल्या कुटुंबाची अधिक काळजी घेण्याचे कळकळीचे आवाहन विभागाचे प्रांत अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले आहे .

Protected Content