Home Cities यावल नावरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आपल्या पत्नीसह ५ उमेदवार बिनविरोध विजयी

नावरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आपल्या पत्नीसह ५ उमेदवार बिनविरोध विजयी


यावल प्रतिनिधी । तालुक्यातील नावरे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीत माजी सरपंचासह पाच उमेदवार बिनविरोध निवडुन आले असुन हे गाव पारंपारीक काँग्रेसचा गढ मानला जातो निवडुन आलेल्या सर्व उमेदवारांचे ग्रामस्थांच्या वतीने कौतुक व स्वागत करण्यात आले आहे.

यावल तालुक्यातील नावरे ग्रामपंचायतच्या सार्वत्रीक पंचवार्षीक निवडणुकीत गावातील प्रभागातील निवडणुक ही बिनविरोध झाली असुन बिनविरोध विजयी होणाऱ्या उमेदवारांमध्ये कॉंग्रेस पक्षाचे एकनिष्ठ असे कार्यकर्ते व मागील दहा वर्ष सरपंचपदाची यशस्वी धुरा सांभाळणारे गावाला स्वच्छता अभियानात राष्ट्रपती पुरस्काराचे मान मिळुन देणारे समाधान धनसिंग पाटील, व त्यांच्या पत्नी उज्वला समाधान पाटील, प्रतिभा पाटील, चंद्रभागा पाटील, दयाराम पाटील यांचा बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये समावेश झाला असून सात उमेदवारांनी या निवडणुकीतुन आपली माघार घेतली असून, उर्वरीत दोन जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

बिनविरोध विजयी झालेल्या सर्व भावी सदस्यांचे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, काँग्रेसचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, जिल्हा परिषद सदस्य रामदास पाटील, यावल सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भिरुड, तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील आदींनी त्यांच्या विजयाचे स्वागत केले आहे.


Protected Content

Play sound