पारोळा तालुक्यात 307 जागांसाठी 661 उमेदवार निवडणूक रिंगणात

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यात 58 ग्रामपंचायतच्या 506 जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका या 15 जानेवारी रोजी होत आहे.त्यासाठी 1458 नामनिर्देशन पत्र हे दाखल करण्यात आले होते. आज मघरींच्या शेवटच्या दिवशी एकूण 598 उमेदवारांनी माघार घेतली आहे.त्यामुळे बारा ग्रामपंचायतीसह एकूण 199 जागा या बिनविरोध झाल्या आहेत.

तर शिल्लक राहिलेल्या दोन रिक्त जागा वगळून 305 जागांसाठी 661 उमेदवार हे निवडणूक रिंगणात असून ते आपले नशीब आजमावत आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायत नीवडणुकीचा हा सर्वाधिक मोठा टप्पा आहे. त्यामुळे तालुक्यात निवडणूक रणधुमाळी शिगेला गेली आहे. राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघी पक्ष सत्तेत असले तरी तालुक्यात याच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते मध्ये चुरशी रंगल्या आहेत. आपल्याच समर्थकांचे वर्चस्व राहण्यासाठी आमदार चिमणराव पाटील, माजी आमदार डॉ सतीश पाटील हे दोघी या निवडणुकांवर लक्ष ठेवून शक्य ते प्रयत्न करीत आहेत. आज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. अनेक जण हे आपला प्रभाग, जागा बिनविरोध करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करीत होते. रुसवे फगवे, मनधरणी चा खेळ हा सुरू होता. त्यात काहींना यश आले तर काहीच्या पदरी निराशा पडत होती. तालुक्यातील दुसऱ्या फळीतील अनेक आजी माजी पदाधिकारी हे या ठिकाणी ठाण मांडून होते.

ग्रामपंचायत बिनविरोध जागा वगळून शिल्लक जागासाठी प्रत्यक्षात रिंगणातील उमेदवार खालील प्रमाणे –

मुंदाने प्र अ जागा 9 उमेदवार 18, पिंपळकोठा जागा 7 उमेदवार 12, अंबापिंपरी जागा 9 उमेदवार 18,सुमठाणे जागा 4 उमेदवार 9, बहादरपूर जागा 9 उमेदवार18, शिरसोदे जागा 8 उमेदवार 18 शेवगे बुद्रुक जागा 4 उमेदवार 8, बोदर्डे वंजारी जागा 6 उमेदवार 17, भोकरबारी जागा 7उमेदवार 15, रत्नापिंप्री जागा 9 उमेदवार 22, भिलाली जागा 8 उमेदवार17 , कोळपिंपरी जागा 9 उमेदवार18, शेळावे बुद्रुक जागा 7उमेदवार15, शेळावे खुर्द जागा 7 उमेदवार 15 , हिरापूर जागा 9 उमेदवार18 ,चिखलोड जागा 1उमेदवार 2, हिरापूर जागा 9 उमेदवार 18 सांगवी जागा 7 उमेदवार14, बाभळेनाग जागा 3 उमेदवार6 , नगाव जागा 6 उमेदवार14, सारवे बुद्रुक जागा 1 उमेदवार 2, विटनेर जागा7 उमेदवार14, पळासखेडे बु जागा1 उमेदवार2, पळासखेडे सीम जागा 4 उमेदवार10 , बाहूटे जागा 7उमेदवार 16, मोरफळ जागा9 उमेदवार 18, मंगरूळ जागा 3 उमेदवार 11, शिरसमणी जागा 10 उमेदवार22 , टिटवी जागा 3 उमेदवार 6 , टेहू जागा 6 उमेदवार 13, हनुमंत खेडे जागा 4 उमेदवार 8, जोगलखेडे जागा 1उमेदवार 2, मुंदाने प्र उ जागा 9 उमेदवार 23, आडगाव गडगाव जागा 6 उमेदवार 12 तरवाडे जागा 7 उमेदवार 16, देवगाव जागा 11 उमेदवार 22 ,तरडी जागा 7 उमेदवार 14, उंदिरखेडे जागा 11 उमेदवार 30 ,टोळी जागा 9 उमेदवार 18 , ढोली जागा 6 उमेदवार10 , पिंपरी प्र उ जागा 6 उमेदवार 13 , वेल्हाने जागा9 उमेदवार18, बोळे जागा 9उमेदवार 24 , तामसवाडी जागा 8 उमेदवार 20 , करमाड बु जागा 4 उमेदवार 8, करमाड खुर्द जागा 11उमेदवार 18, रताळे जागा 6 उमेदवार 13 बिनविरोध ग्रामपंचायत चोरवड, महाळपूर, वसंतवाडी, इंधवे, विचखेडा, करंजी बु, भोलाने, शिवरे, दळवेल, सावरखेडे, जीराडी, वसंतनगर आजी माजी लोकप्रतीनिधीच्या गावात मात्र चुरशीच्या निवडणुका गावा गावातील सलोखा शांतता टिकून राहावे म्हणून बिनविरोध निवडणूक करणारे गावांना आमदार चिमणराव पाटील यांनी आमदार निधी व इतर निधीतून विकासासाठी 21 लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली आहे.त्याला काही जी प सदस्यांनी देखील अतिरिक्त निधीचा पाठिंबा देऊन प्रोत्साहन दिले आहे. विकासाचा हा मोठा निधी पाहता काही गावांनी त्याला प्रतिसाद देत आप आपल्या गावातील निवडणूक बिनविरोध केली आहेत. मात्र विद्यमान आमदार चिमणराव पाटील देवगाव, माजी आमदार डॉ सतीश पाटील तामसवाडी, माजी खासदार ऍड वसंतराव मोरे टेहू, पंचायत समिती सभापती रेखाबाई भिल उंदिरखेडे, उपसभापती अशोक पाटील आंबपिपरी, या लोकप्रतिनिधी च्या गावात अपवाद वगळता चुरशीच्या निवडणूका या होत आहे. काही ठिकाणी बिनविरोधचे प्रयत्न झाले. तर काही ठिकाणी मोकळे रान होते.

ग्रामपंचायत दावा

तालुक्यातील बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत पैकी विचखेडा करंजी या दोघांवर शिवसेनेने दावा केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवरे, सावळखेडे , करंजी वर दावा केला आहे. करंजी वर दोघी पक्षाने दावा केला आहे हे विशेष.

मंगरूळ ग्रामपंचायतीचा घोळ

तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायत च्या प्रभाग एक व तीन हे वेळेत बिनविरोध झाले होते. तर प्रभाग तीन बिनविरोध साठी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दोघी गटात घोळ सुरू होता. शेवटचा 10 मिनिटे हा निर्वाणीचा इशारा मिळाल्यावर तो प्रभाग देखील बिनविरोध झाला आहे. मात्र राखीव प्रभाग 4 मध्ये निवडणूक होत आहे.

 

 

 

Protected Content