चाळीसगावात पूरग्रस्तांचे अतोनात नुकसान

चाळीसगाव जीवन चव्हाण । शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. मात्र दीड महिने उलटूनही राज्य सरकारकडून भरीव मदत न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

चाळीसगाव शहरासह तालुक्यात ३० ऑगस्ट रोजी मध्यरात्री अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे क्षणार्धात होतेचे नव्हते झाले. डोंगरी व तितूर नदीला पूर आल्यामुळे अनेकांचे घरे व जनावरे वाहून गेली. तर शेतकऱ्यांचा उभा पिक जमीनदोस्त होऊन काहींची जमीनच वाहून गेली. यानंतरही पाऊस संततधार सुरूच असल्याने तालुक्याला एकूण सहा वेळा पूरस्थिती निर्माण होऊन जबर तडका बसला. त्यात बहुतांश जणांचे जगणेच असाह्य होऊन बसले. त्यात पंचणामे हे खूप संथगतीने करण्यात आले. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून तत्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात येईल या आशेच्या किरणावर पूरग्रस्त हे जगत आहे. परंतु दीड महिने उलटूनही राज्य सरकारकडून नुकसानग्रस्तांना मदत जाहीर न झाल्यामुळे आमचे कोणी वालीच नसल्याची चर्चा सध्या नुकसानग्रस्त भागात सुरु आहे. तत्पूर्वी ३० ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात घरे वाहून जाऊन पडझड झाली. तर अनेक जण बेघर झाले. वास्तव्य करण्यास घरच नसल्याने त्यांची गैरसोय झाली. मात्र प्रशासनाने पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्यामुळे याचे मनस्ताप मोठ्या प्रमाणात सहन करावे लागले.

दरम्यान या नैसर्गिक आपत्तीत चाळीसगाव तालुक्याचे विद्यमान आमदार मंगेश चव्हान यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. त्यांनी तत्काळ स्वखर्चाने पत्र्यांचे घरे उपलब्ध करून दिल्याने बहुतांश जणांची गैरसोय दूर झाली. तसेच आमदार मंगेश चव्हाण यांचे भर पाऊसात नुकसानग्रस्त भागात  दौरे हे सुरूच होते. यामुळे कठीण परीस्तीत ते नागरिकांच्या पाठीशी राहिल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक झाले. तर दुसरीकडे नुकसानग्रस्त भागात अनेक मंत्र्यांच्या झुंबडाने  पाहणी केली. परंतु त्या पाहणीत काहीच तथ्य नसल्याचे उघड झाले आहे. कारण दिड महिने उलटून अद्याप नागरिकांना मदतीची प्रतिक्षा करावी लागत असल्याने सदर मदत जाहीर करण्यात येईल का? असा संशय चर्चिला जात आहे. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांचे आतातरी विचार करेल का? याकडे संबंध राज्याचे लक्ष लागले आहे.


जीवन चव्हाण, चाळीसगाव प्रतिनिधी

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!