अंजली दमानिया यांची ईडी कडून चौकशी

मुंबई प्रतिनिधी । भोसरी भुखंड खरेदी प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची आज ईडीने चौकशी केली. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या चौकशीआधी दमानियांनी त्यांना काही कागदपत्रे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, भोसरी येथील भूखंड प्रकरणी एकनाथराव खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहे. कोरोना झाल्यामुळे त्यांची चौकशी तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. याआधी या प्रकरणाशी संबंधीत बाबींना जमा करण्यात येत असल्याचे आज निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची चौकशी करण्यात आली.

दमानिया यांनी खडसे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या पार्श्‍वभूमिवर आज त्यांनी ईडीला नेमकी काय माहिती दिली याबाबत उत्सुकता लागली आहे. चौकशी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना दमानिया म्हणाल्या की, मला ईडीचा समन्स आला होता. म्हणून मी आली होती. त्यांनी मला जी काही माहिती विचारली ती मी दिली. मला जर पुन्हा ईडीतर्फे बोलवलं गेलं तर मला यावचं लागणार आहे. तसेच. मला कुठल्याही राजकारणात पडायचं नाही. माझी जी कोर्टात याचिका होती त्यासंदर्भात मला ईडीने काही माहिती विचारली. ती माहिती मी ईडीला दिली आहे. यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही, असेही अंजली दमानिया यांनी पत्रकारांना सांगितले.

Protected Content