विधानसभा निवडणुकीत अवैध व्यवहार आणि काळ्या पैशावर आयकरची करडी नजर

income tax department

 

पुणे प्रतिनिधी । आयकर विभागाची आज पत्रकार परिषद घेण्यात आली असून विधानसभा निवडणूक काळातील काळापैसा, आर्थिक देवाण-घेवाण, सोनं-चांदीचे वाटप टाळण्यासाठी पुणे आणि नागपूर या दोन शहरात 24 तास कार्यरत राहणाऱ्या नियंत्रण कक्षाची स्थापना यावेळी करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर आयकर विभागाच्या अन्वेषण संचालनालयाने हे आवाहन केलं आहे. आज आयकर विभागाची पत्रकार परिषद पार पडली. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. निवडणूक काळातील काळापैसा, आर्थिक देवाण-घेवाण, सोनं-चांदीचं वाटप टाळण्यासाठी पुणे आणि नागपूर या दोन शहरात चोवीस तास कार्यरत राहणाऱ्या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी आयकर विभागाने सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. त्यासाठी आयकर विभागाने व्हॉट्सअॅप मेसेजजारी केले असून या मेसेजवर माहिती पाठवण्याचे आवाहन केले आहे. पुण्यातील तक्रारीसाठी १८०० २३३०७०० आणि १८०० २३३०७०१ या टोल फ्रि नंबरवर आणि ७४९८९७७८९७ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आणि ०२०-२४२६८८२५ या फॅक्स क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर नागपूरमधील तक्रारींसाठी टोल फ्रि क्रमांक १८००२३३३७८५, व्हॉट्सअॅप क्रमांक ९४०३३९१६६४ आणि फॅक्सक्रमांक ०७१२-२५२५८४४ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content