कर्नाटकातील काँग्रेस, जेडीएसचे १४ आमदार अपात्र

236778 kumaraswamy and yeddyurappa

 

बेंगळुरू (वृत्तसंस्था) कर्नाटक विधानसभेत बंड करणारे काँग्रेस, जेडीएसच्या १४ आमदारांना विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. येडीयुरप्पा उद्या विश्वासदर्शक ठराव सादर करणार आहेत. त्याला सर्व आमदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रमेशकुमार यांनी केले आहे. १४ आमदार अपात्र ठरल्यामुळे विधानसभेची सदस्यसंख्या आता अध्यक्षांसह २०८ वर आली आहे.

 

कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याने आता वेगळेच वळण घेतले आहे. कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर आज (रविवार) विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी जेडीएस आणि काँग्रेसच्या १४ बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले आहे. यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी ३ आमदारांना अपात्र घोषित केले होते. काँग्रेस-जेडीएसच्या एकूण १७ आमदारांनी बंडखोरी करत पक्षांकडे राजीनामे सादर केले होते. यानंतर अल्पमतात आलेल्या कुमारस्वामी सरकारला बहुमत गमवावे लागले होते. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना उद्या (सोमवार) बहुमत सिद्ध करावे लागणार असून विधानसभा अध्यक्षांचा आजचा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान , १४ आमदार अपात्र ठरवल्याचा फायदा भाजपालाच होणार अशी चिन्हं आहेत.

Protected Content