एनआयए विशेष न्यायालयात यासीन मलिक दोषी

नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी तसेच माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीचे अपहरण आणि हवाई दलातील ४ जवानांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या यासीन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणी एनआयए विशेष न्यायालयात दोषी असल्याचा निर्णय दिला आहे.

यासीन मलिक काश्मीरमधील राजकारणात सक्रीय असून युवकांना भडकवण्यात आणि दहशतवादी कारवायात त्याचा हात होता. जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंटशी संबंधीत असून यावर २०१९ मध्ये बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी यासीन मलिकने काश्मीर खोऱ्यात कथित दहशतवाद फुटीरतावादी कारवायाची कबुली दिली. त्याच्यावर युएपीईसह दहशतवाद, कट, त्यासाठी निधी जमा करणे, गुन्हेगारी, देशद्रोह अशा अन्य कलमानुसार गुन्हे दाखल असून १९९० मध्ये हवाई दलाचे चार जवानाची हत्या तसेच माजी केंद्रीय मंत्री मोहमद सईद याच्या रुबिया नामक मुलीचे अपहरण केल्याचा आरोपाच्या गुन्ह्यांची कबूली दिली आहे.

यावर काश्मीर नेतृत्वाचा आवाज भारत सरकार दडपण्याचा प्रयत्न करीत असून २०१९ पासून यासीन मलिकला खोट्या प्रकरणात अडकवित अमानवीय परिस्थितीत तिहार जेलमध्ये ठेवले असल्याचे पाकिस्तान दुतावासाने म्हटले आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने यासीन मलिक यास टेरर फंडिंग संदर्भात दोषी असल्याचा निर्णय दिला यावर २५ मे रोजी मलिकच्या शिक्षेवर चर्चा होणार आहे.

Protected Content