फैजपुरात दिव्यांग सेनेतर्फे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । लॉकडाऊनमुळे दिव्यांगांची उपासमार होत असल्याने शासनातर्फे जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात अशा मागणीचे निवेदन येथील दिव्यांग सेनेच्या शाखेतर्फे मुख्याधिकार्‍यांना देण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात, राज्यात तसेच जिल्ह्यात प्रशासनाने लाँकडाऊन करण्यात आले आहे की ज्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दिव्यांग व्यक्तीस घराबाहेर निघता येत नाही. अनेकांचे रोजगार बंद झाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. यात मुख्यत्वे करुन दिव्यांग बांधवांचे खुप हाल होत आहेत. यासाठी फैजपूर नगरपरीषदेमार्फक दिव्यांग व्यक्तीना जीवनाश्यक खाद्योपयोगी वस्तू (गहू,तांदूळ,साखर तेल तत्सम आदि वस्तू)तसेच सँनिटायझर मास्क तत्सम आदींसह पाच टक्के निधी त्वरित मिळावा यासाठी दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. फैजपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी दिव्यांग सेनेचे फैजपूर शहराध्यक्ष नितिन महाजन, उपाध्यक्ष नाना मोची, सचिव मुन्ना चौधरी, देवेंद्र साळी, संजय वानखेड,े ललित वाघुळदे, रोहीत तायडे, गणेश भारंबे यांची उपस्थिती होती.

Protected Content