कोरोनाग्रस्तांना माजी पं.स. सभापती अनिल पाटीलांची एक लाखांची मदत

धरणगाव प्रतिनिधी । येथील पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आवाहनानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक लाख रूपयांची मदत दिली.

याबाबत वृत्त असे की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रदान केले असून त्यांच्या खात्याच्या कर्मचार्‍यांनी एक दिवसाचा पगार दिला आहे. तसेच ना.गुलाबराव पाटील यांनी जनतेला आपापल्या परीने मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहना नुसार धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक लाख रूपयांची मदत जाहीर केली. त्यांनी याबाबतचे पत्र ना. गुलाबराव पाटील व तहसीलदार देवरे यांना प्रदान केले.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, धरणगाव नगरीचे नगराध्यक्ष निलेश चौधरी, पं. स. तीचे माजी सभापती दिपक सोनवणे, टिकाराम पाटील,नवलसिंग पाटील (राजे), रवी कंखरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content