अमळनेरात पॅरोलवरील गुन्हेगाराचा खून

अमळनेर, प्रतिनिधी । सध्या पॅरोलवर सुटलेला येथील सराईत गुन्हेगार राकेश चव्हाण याचा येथील ख्वाजा नगर भागात लाकडी दांडक्याने मारून खून झाल्याची घटना रात्री आठच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे.

पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. दरम्यान राकेश चव्हाण यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला डझनभर गुन्हे दाखल असून अंतर्गत गून्हेगारीतून हा खून झाला असावा असा अंदाज आहे. तो दोन दिवसापुर्वीच लातूर जेल मधून जामीनावर सुटला होता. काही दिवसांपूर्वी त्याने अमळनेर रेल्वे स्टेशनला पोलीस चौकीवर हल्ला करून वाहन व चौकीचे नुकसान करून ८ ते ९ महीन्या पासुन फरार झाला होता .
तदनंतर भुसावळ येथे गावठी बंदूकसह पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली होती. तात्कालीन पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदशनखाली सहाययक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी त्याला भुसावळ येथून ताब्यात घेऊन अटक केली होती. सराईत गुन्हेगार राकेश वसंत चव्हाण याच्यावर अमळनेर पो.स्टे सह भुसावळ, नंदुरबार, ला त्याच्या विरुद्ध अजून इतर काही पो.स्टे ला गुन्हे दाखल होते. तो अमळनेर पो.स्टे ला रेकार्ड वरील हिस्ट्रीशीटर आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content