बोदवडात पत्रकारांची बदनामी केल्याप्रकरणी पोलीसात तक्रार

बोदवड प्रतिनिधी । शहरातील सोशल मिडियावर पत्रकारांविरोधात अवमानजनक शब्द वापरून बदनामी केल्याप्रकरणी एकावर बोदवड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, सर्व देशात लॉकडाऊन सुरू असताना कायदा सुव्यवस्था जबाबदारी पोलिस प्रशासन इतर सरकारी अधिकारी यांची असतांनाही बोदवड येथील अमोल शिरपूरकर हा नेहमीच फेसबुकवर अश्लील भाषा वापरून पत्रकाराची बदनामीची पोस्ट टाकत आहे. अशा समाज कटकावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आले. तसेच मुस्लिम समाजविरुद्ध अमोल शिरपूरकर याने आक्षेपार्ह पोस्ट वापरून जातीत तेढ निर्माण होईल अशी पोस्ट वारंवार मुस्लिम समाजविरुद्ध जातीय तेढ निर्माण होईल. मुस्लिम समाजाला बदनाम करत असतो गावात दंगल घडविण्याचे प्रयत्न करत असतो, अश्या व्यक्ती विरोधात कठोर कडक कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार नईम बागवान याने पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आली.

Protected Content