पोकरा योजनेत सामूहिक प्रयत्नांमधून जलसिंचन ( व्हिडीओ )

pokra yojna

अमरावती प्रतिनिधी । जिल्ह्यातील बेनोडो शिवारात शेतकर्‍यांनी सामूहिक प्रयत्नांमधून जलवाहिन्यांच्या मदतीने जलसिंचनाचा प्रयोग यशस्वी केला असून पोकराचे मृदू विशेषज्ञ भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी पाहणीत त्यांचे कौतुक केले आहे.

याबाबत वृत्त असे की, नानाजी देशमुख कृषी सिंचन योजना म्हणजेच पोकराचे प्रमुख मृदा विशेषज्ञ भाऊसाहेब बर्‍हाटे हे सध्या राज्य दौर्‍यावर असून ते ठिकठिकाणी योजनेच्या अंमलबजावणीची पाहणी करत आहेत. यात ते शेतकर्‍यांशी संवाददेखील साधत आहेत. दरम्यान, या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातल्या वरूड तालुक्यातील बेनोडा शिवारात त्यांनी पाहणी केली. यात ११ शेतकर्‍यांनी एकत्रीतपणे जलवाहिनी तयार करून सुमारे दोन किलोमीटरपर्यंत शेतांमध्ये जलसिंचन केले. हा प्रयोग यशस्वी झाला असून यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी या योजनेची पाहणी करून संबंधीतांचे कौतुक केले.

खालील व्हिडीओत पहा हा यशस्वी प्रयोग.

Protected Content