जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोविड रुग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात एक ही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ७९० रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २०८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.एस. चव्हाण यांनी दिली आहे.