अमळनेरात ‘जय भीम’ चित्रपटास उत्स्फूर्त प्रतिसाद

अमळनेर प्रतिनिधी | सामाजिक संदेश देणाऱ्या बहुचर्चित ‘जयभीम’ या चित्रपटाचे अमळनेरच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मोफत प्रदर्शन करण्यात आले. त्याचा शहरातील सुमारे दोन हजार प्रेक्षकांनी लाभ घेतला.

सार्वजनिक ठिकाणी ‘जयभीम” हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग अमळनेर शहरात झाला. यावेळी आ.अनिल पाटील यांनी या चित्रपट प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी “जयभीम हा चित्रपट मानवतेची लढाई लढायला शिकवतो संघर्ष करायला प्रेरणा देतो असे सांगत आपला लढा अर्ध्यावर सोडू नये तडीस न्यावा” असे आवाहन केले.त्यानी नाट्यगृहातच चित्रपट पाहिला.

सामाजिक संदेश देणाऱ्या या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन पत्रकार समाधान मैराळे, सामाजिक कार्यकर्ते संदिप सैंदाने, पत्रकार सुरेश कांबळे, युवा कार्यकर्ते प्रविण बैसाने यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात ‘समाजात मानवतेच्या सामाजिक संवेदना जागृत राहाव्यात यासाठीच संयोजकांनी चित्रपटाचे प्रदर्शन ठेवल्याचे’ कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी स्पष्ट केले. तर चित्रपटाबद्दल अधिक माहिती देतांना “अन्यायाविरुद्धचा लढा म्हणजे जयभीम ! मानवतेसाठी चा लढा म्हणजे जयभीम! असत्याशी लढतांना फक्त सत्यच आपला विजय करू शकते असा सामाजिक दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी जयभीम चित्रपट पहाणे गरजेचे असल्याचे” प्रा.लिलाधर पाटील यांनी यावेळी सांगितले.

अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील, मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांचेसह मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी नाट्यगृह उपलब्ध करून दिले. चित्रपटाच्या तिन्ही शो ला अनेक मान्यवर हजर होते. माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पाटील, शिवाजी पाटील, मा.नगरसेवक विनोद कदम, पन्नालाल मावळे, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, मोरया नाट्य संस्थेचे संदिप घोरपडे, हेमंत पाटील, प्रा. एम. एन. संदानशिव, प्रा.डॉ. विजय तुंटे, डॉ. योगेश नेतकर, पोलिस उप निरीक्षक नरसिंग वाघ, युवराज चव्हाण, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव पाटील, श्रीकांत चिखलोदकर, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे, अरुण सोनटक्के आदी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बंधू याप्रसंगी उपस्थित होते.

Protected Content