खा. उन्मेष पाटलांच्या व्यवस्थेने भारावले विद्यार्थी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार उन्मेषदादा पाटील यांनी जळगावातील विद्यार्थ्यांची दिल्लीत आपल्या निवासस्थानी व्यवस्था केल्याने विद्यार्थी भारावले.

येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे प्रशाळेच्या राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थी सध्या दिल्लीत शैक्षणिक सहलीवर आहेत. जळगावचे खासदार उन्मेष दादा पाटील यांनी दिल्लीत सदर विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणासाठी स्वतःचे सरकारी निवासथान उपलब्ध करून दिले. तसेच संसद भवन पाहण्यासाठी आवश्यक पास उपलब्ध करून दिल्यात. खासदार उन्मेष पाटील यांनी आस्थेवाईक पणे केलेल्या चौकशी मुळे स्वागतामुळे विद्यार्थी भारावले. सदर शैक्षणिक सहल सामाजिक शास्त्रे प्रशाळेचे संचालक प्रा डॉ अजय पाटील व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ उमेश गोगडीया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली आहे.

या विद्यार्थ्यांसोबत प्रा. लोकेश तायडे,प्रा पौर्णिमा देशमुख, प्रा अक्षय सपकाळे, बाबासाहेब जाधव व कल्पेश चौधरी हे आहेत. या अभ्यास दौर्‍यात विद्यार्थी संसद भवन,राष्ट्पती भवन, अनुसूचित जनजाती आयोग, विद्यापीठ अनुदान आयोग, आय सी एस एस आर इ. ठिकाणी भेट देणार आहेत.

Protected Content