पहूरला आजपासून भव्य कीर्तन सोहळा

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील लेले नगर हनुमान मंदीरात आजपासून कीर्तन सोहळा आणि संगीतमय भागवत कथेस प्रारंभ होत आहे .

पहूर येथील कीर्तन सोहळ्याचे यंदा १९ वे वर्ष आहे. हभप ईश्‍वर महाराज पाळधीकर हे दररोज दुपारी १२ ते ४या वेळेत संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे निरूपण करणार आहेत. तर, मंगळवारी शिवशाहीर हभप गोपाल महाराज ( चिमठाणे ), बुधवारी गोधन प्रचारक हभप उल्केश महाराज (पातोंडा ) , गुरूवारी धर्मभुषण हभप जनार्दन महाराज (अरावे ), शुक्रवारी समाजभूषण हभप तुषार महाराज (दौंड ) , शनिवारी कीर्तन केसरी हभप रवी महाराज (तारखेडा ), रविवारी गायनाचार्य हभप जीवन महाराज (नाडगांव ) , सोमवारी विनोदाचार्य हभप भानुदास महाराज ( अमळनेर ) यांचे कीर्तन होणार आहेत. २ एप्रील रोजी मंगळवारी हभप भागवताचार्य हभप दत्ता महाराज ( देवळी ) यांच्या काल्याच्या कीर्तनाने कीर्तन सोहळ्याची सांगता होणार आहे .

या कीर्तन सोहळ्यादरम्यान दररोज सकाळी काकडा भजन , दुपारी संगीतमय भागवत कथा, सायंकाळी हरीपाठ आणि रात्री हरी कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सांगता समारोहानिमित्त महाप्रसाद ,पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. यशस्वीतेसाठी हभप गजानन महाराज , शिवदास लहासे,विजय बनकर, दिपक जाधव, समाधान जाधव, ज्ञानेश्‍वर चौथे, रामदास सोनवणे, श्रीकृष्ण सोनवणे, शिवाजी बावस्कर, प्रमोद घोंगडे, शिवभक्त रंगनाथ महाराज, भागवत सोनवणे, रविंद्र क्षीरसागर , सुनिल पाटील, संतोष भिवसणे, उत्तम गोल्हारे, आनंदा उबाळे, प्रकाश घोंगडे, दत्तात्रय घोंगडे, तुकाराम राऊत, धनराज बनकर, गोविंदा घोंगडे, बबलू मालकर, प्रल्हाद वानखेडे, शंकर बनकर, संभाजी देशमुख, विनोद बोरसे, मोतीलाल चौथे, सुधाकर करवंदे, धनराज सोनवणे यांच्यासह भजनी मंडळ, ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत.

Add Comment

Protected Content