भाजपने शिवसेनेला गृहीत धरू नये- समाधान महाजन

भुसावळ प्रतिनिधी । खासदार रक्षा खडसे यांनी केलेला दावा खोटा असून भाजपने आम्हाला गृहीत धरू नये असा प्रतिपादन शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी एका पत्रकान्वये केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी एक पत्रक जारी केले आहेत. यात ते म्हणतात की, चोपड्यापासून तर थेट नांदुर्‍यापर्यंत सर्व शिवसैनिक माझ्या सोबत आहेत. केवळ एक दोन कार्यकर्त्यांचाच विरोध आहे. ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे मत रावेर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे व्यक्त केले होते. हे सपशेल चुकीचे असून त्या दिशाभूल करीत आहेत. उलट एक दोनच शिवसैनिक त्यांच्या संपर्कात असून आधीपासूनच त्यांना बंडखोरीचे लेबल लागले आहे. रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करून आम्ही रावेर मतदार संघात भाजपचे काम करणार नाही, असा ईशारा दिला आहे. शिवसेना भाजपची युती झाली आहे हे मान्य असून पक्ष प्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांची भेट जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील सह चोपड्या पासून तर थेट नांदुर्‍यापर्यंतचे सर्व तालुका प्रमुख, तालुका संघटक, विधानसभा क्षेत्रप्रमुख इतर पदाधिकारी व सर्व शिवसैनिक घेणार आहेत.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, रक्षा खडसे यांनी कोणत्याही शिवसैनिकांची भेट घेतली नसून परस्पर वक्तव्य करीत आहे. उलटपक्षी वारंवार युती धर्म मोडीत काढून भारतीय जनता पार्टीने निवडणूक पूर्व कामे, मेळावे स्वबळावर सुरू केली असून त्यांना शिवसेनेची गरज नाही असे ते दर्शवत आहे. युती धर्म पाळा म्हणणारेच तो तोडतात आणि वरिष्ठांना ऑल इज वेल आहे असे भासवीत आहे. युती झाल्यानंतर सुद्धा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घेत असल्याचे सर्व तालुका प्रमुखांनी जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले असून म्हणूनच मातोश्रीवर भेट दिली जाणार आहे. पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या भेटी दरम्यान रावेर मतदारसंघात होणार्‍या सर्व घडामोडी त्यांच्या समोर मांडू असे सर्व तालुका प्रमुख, सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांचे एकमत झालेले असल्याचे समाधान महाजन यांनी या पत्रकात म्हटले आहे.

One Response

Add Comment

Protected Content