Home Cities जळगाव कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. उल्हास पाटील यांची नियुक्ती

कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. उल्हास पाटील यांची नियुक्ती

0
102

जळगाव प्रतिनिधी | भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी खासदार तथा गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे केंद्री सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज राज्यातील महत्वाच्या पदाधिकार्‍यांची घोषणा केली. यात जळगाव येथील माजी खासदार तथा गोदावरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आधी देखील या पदावर काम केले असून आता त्यांना नव्याने या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर, डॉ. उल्हास पाटील यांची करण्यात आलेली नियुक्ती ही अतिशय महत्वाची मानली जात आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या महानगराध्यक्षपदी पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी शामकांत तायडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पक्षत्याग करून भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर हे पद रिक्त होते. आता याचीच जबाबदारी तायडे यांच्याकडे आलेली आहे.


Protected Content

Play sound