किनगावच्या इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलचा शंभर टक्के निकाल !


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगावं-डोणगावं रस्त्यावरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलने इयत्ता दहावीच्या परीक्षेत यावर्षीही आपल्या निकालाची १०० टक्के यशस्वी परंपरा जपली आहे. शाळेतील एकूण १३७ विद्यार्थी दहावीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेस बसले होते आणि या सर्वांनीच उत्तम यश संपादन केले आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये, शाळेचा विद्यार्थी देव संजय पाटील याने ९२.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, ईशिता विनय महाजन हिने ८९.८० टक्के गुण मिळवून द्वितीय आणि तेजस ज्ञानेश्वर सपकाळे याने ८९ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. विशेष बाब म्हणजे, शाळेतील उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनीही ७५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले आहे, जे शाळेच्या उत्कृष्ट शैक्षणिक दर्जाचे प्रतीक आहे.

या शानदार यशाबद्दल शाळेचे चेअरमन विजय कुमार देवचंद पाटील, सचिव मनिष विजयकुमार पाटील, मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील, उपमुख्याध्यापक सुहास भालेराव आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिले. शाळेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाची प्रशंसा केली, ज्यामुळे शाळेला हे उल्लेखनीय यश प्राप्त झाले