तेजस्विनी खांजोडकरचे दहावीच्या परिक्षेत यश


पहूर-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर येथील रहिवासी आणि आर.एल. ललवाणी हायस्कूलची विद्यार्थिनी तेजस्विनी अंजली खांजोडकर हिने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने ८९ टक्के गुण मिळवून आर.एल. ललवाणी विद्यालयातून दुसरा क्रमांक पटकावला आहे.

तेजस्विनीला आर.एल. ललवाणी विद्यालयातील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ती आर.टी. लेले हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक खांजोडकर यांची नात, तर अंजली अशोक खांजोडकर यांची मुलगी आहे. तेजस्विनीच्या या शानदार यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कुटुंबीयांनी आणि मित्रपरिवाराने तिच्या या यशाचे कौतुक केले असून, पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.