खामगावकर प्रशिक्षक गोपाल शर्मा यांचा राष्ट्रीय पातळीवर डंका

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खामगाव येथील सुप्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक गोपाल तेजमल शर्मा यांची इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन १ चॅम्पियन टीम टायगर्स ऑफ कोलकाता साठी निवड करण्यात आली आहे.

गोपाल शर्मा यांना या लीगमध्ये टेक्निकल टीम अॅनालिस्ट म्हणून नियुक्त करण्यात आले असून, त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे.सदर लीग २६ जानेवारीपासून सुरू होणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोटर्स फर्स्ट आणि हॉटस्टॉर या प्लॅटफॉर्मवर संध्याकाळी ७:३० वाजता पाहता येईल.

गोपाल शर्मा गेल्या १५ वर्षांपासून क्रिकेट क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आयपीएल, आयएसएल, आणि मुंबई टी-२० लीग यांसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये काम करण्याचा अनुभव असून, ते नवीन खेळाडूंच्या विकासासाठी सतत कार्यरत आहेत. त्यांचा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत काम करण्याचा अनुभव, टायगर्स ऑफ कोलकाता टीमसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

Protected Content