जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात नाशिक येथील नाशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त विद्या रतन किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. पथकाने मंगळवारी दुपारी 12 वाजता केलेल्या चौकशीत बांधकामाच्या व्यवहारातील टीडीएस संदर्भात चौकशी करण्यात आली आहे.

या संदर्भात महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर यांच्या दालनात चौकशीला सुरुवात करण्यात आली. ही चौकशी सकाळी 10 वाजेपासून सुरुवात करून रात्री 8 वाजेपर्यंत सुरू होती. चौकशीत वैद्यकीय बिले जमा खर्च यांच्याशी संबंधित टीडीएस कपात शासकीय नियमानुसार झाली किव्हा नाही याची तपासणी करण्यात आली. त्याच प्रमाणे चिंचोली येथील वैद्यकीय महाविद्यालय निर्माण कार या कार्यासंदर्भात कार्यादेश खरेदी बीले याच्याशी निगडित शासनाचा आलेला निधी व त्याचे नियमन याबाबत हि तपासानी असल्याचे अधिकृत रित्या सांगण्यात आले. या कारवाईमुळे वैद्यकीय महाविद्यालयात खळबळ उडाली आहे.