दिल्ली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भाजपाला पाठिंबा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये राजकीय वर्तुळात चांगलीच हालचाल सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे युतीत असलेल्या घटक पक्षांनी एकत्र येण्याचा संकेत दिला आहे. या पत्रात, भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना शिवसेनेचा पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले गेले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षविरुद्ध आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात लढत होत आहे. यात इंडिया आघाडीतील अनेक घटक पक्षांनी आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे युतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र भारतीय जनता पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भात काँग्रेसने आम आदमी पक्षावर देशद्रोही असल्याचा आरोप केला होता. या काँग्रेसच्या आरोपाशी आम्ही सहमत नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते.

Protected Content