केसीईचे आयएमआर येथे वक्तृत्व आणि पोस्टर स्पर्धा उत्साहात

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेसाठी विषय हे आयत्या वेळी पाच मिनिटे आधी देण्यात आले होते .हवामान बदल हा मानवतेसमोर सर्वात मोठा धोका आहे. किशोरवयीन गुन्हेगारांना मोठ्यांचे कायदे लागू करावे का? जागतिक शांतता महत्त्वाची.  अवयव दान गरजेचे. ई लर्निग हवे. सायबर सिक्युरिटी महत्त्वाची आहे. सर्व ड्रगला कायदेशीर मान्यता मिळावी का? जागतिक पर्यावरण, वर्क फ्राॅम होम,विविध टप्प्यावरील महिला सुरक्षा. कॅशलेस इंडिया, आपल्या गावातील रस्ते सुरक्षा असे अनेक विषय विद्यार्थ्यांनी चिठ्ठी उचलुन निवडले. त्यावर आपली मुद्देसुद मते मांडलीत.  स्पर्धकांसाठी विषयासंबधीची माहिती, बोलण्यातला मुद्देसूदपणा आणि आत्मविश्वास, विषयाची सुरवात आणि शेवट, महत्वाचा ठरला .

या स्पर्धेचे उद्घाटन करतांना संचालक प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांनी “आयत्या वेळेला विषय मांडण्यासाठी प्रेझेन्स आॅफ माईंड हवा,  अवेअरनेस आणि वाचन चांगले हवे. सर्व विषयांचे नाॅलेज हवे..तुम्हाला उत्फुर्त बोलता यायला हवे म्हणुन आपण या पध्दतीने स्पर्धा घेत असतो असे सांगितले. या स्पर्धेत भावेश चेतन टोंगळे प्रथम (विषय :सायबर सुरक्षा), ऋतुजा सुधीर करांडे (अवयवदान), प्रविण शिवाजी पाटील (प्राण्यांवर प्रयोग करण्यास बंदी असावी का? या स्पर्धेसाठी प्रा प्रसाद देसाई आणि प्रा पंकज व्यवहारे यांनी काम पाहिले.

तर पोस्टर स्पर्धेसाठी प्रा पियुष बडगुजर यांनी काम पाहिले. त्या स्पर्धेतील विजेते प्रथम – श्रृती डायमा द्वितीय – साक्षी नाथजोग आणि तृतिय – सायली पवार विजेते ठरलेत.

या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा. मानसी भंगाळे यांनी केले तर आभार प्रा शमा सराफ यांनी मानले. तिन्ही प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या स्पर्धेसाठी संचालक प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली इव्हेंट कोआॅरडिनेटर डॉ. शमा सराफ तसेच दिपाली पाटिल, जयश्री महाजन, डॉ अनुपमा चौधरी, नेहा ललवाणी, हरप्रित सैनी प्रियांका खरारे, श्वेता फेगडे, योगेश्वरी यावलकर यांनी सहकार्य केले

 

Protected Content